Pudina Tea : पुदिना चहा कधी ट्राय केला आहे का? पोटाच्या समस्यांवर ठरतो रामबाण

पुढारी वृत्तसेवा

ग्रीन टी, हर्बल टी आल्याच चहा ही आपल्या साध्या चहासाठी हेल्थी पर्याय आहेत. यामध्ये एक आहे पुदिना चहा

पुदिना चहाचे सेवन करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पचनक्रीया सुधारणे, पोटातील अनेक समस्यांचे निवारण करण्याची ताकद पुदिना चहात असते

पुदिन्यातील 'मेन्थॉल' पोटाचे स्नायू शिथिल करते, ज्यामुळे अपचन, पोट फुगणे (गॅस) आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

डोकेदुखी व ताण कमी करतो: मेन्थॉलच्या सुगंधाने मज्जासंस्थेला शांतता मिळते आणि स्नायूंचा ताण कमी होऊन डोकेदुखी हलकी होते.

सर्दी-खोकल्यात उपयुक्त: गरम पुदिना चहाची वाफ आणि त्याचे अँटीबैक्टीरियल गुणधर्म घशातील खवखव, बंद नाक आणि कफ साफ करण्यास मदत करतात.

तोंडाची दुर्गंधी दूर करते: पुदिन्यातील अँटीबॅक्टेरियल घटक तोंडातील जंतू नष्ट करून श्वासाला दीर्घकाळ ताजेतवाने ठेवतात.

वजन नियंत्रणात सहाय्यक: हा चहा कॅलरी-मुक्त असतो आणि metabolism सुधारून अनावश्यक भूक कमी ठेवण्यास मदत करतो.

पुदिना चहामध्ये कॅफिन नसल्यामुळे झोपेवर कोणताही दुष्परिणाम न होता थकवा दूर होतो कॅफिनचे दुष्परीणामही टाळता येतात

हा चहा बनविताना : १.५ कप पाण्यामध्ये ८ ते १० स्वच्छ धुतलेलीपुदिन्याची ताजी पाने अर्धा इंच आल्याचा तुकडा, घालुन एकत्र ३ ते ४ मिनिटे उकळवा

गॅस बंद करून चहा कपमध्ये गाळून घ्या.चहा थोडा कोमट झाल्यावर त्यात लिंबाचा रस आणि आवडीनुसार मध मिसळा (गरम चहात मध घालू नये) कोमट असताना घ्या