उन्हापासून डोळ्यांचा असा करा बचाव

गणेश सोनवणे

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.

कडक उन्हात घराच्या बाहेर पडताना डोळ्यांवर चांगल्या दर्जाचा गॉगल वापरणे अतिशय चांगले.

या दिवसात अनेकदा डोळे कोरडे पडतात. डोळे कोरडे पडत असतील तर मॉयश्चराईज ड्रॉप डोळ्यात टाका.

उन्हाच्या तडाख्यापायी डोळे लाल झाले तर बाजारात मिळणारी औषधे स्वतःहून डोळ्यात न टाकता साध्या स्वच्छ पाण्याने डोळे धुणे अतिशय हितकारक आहे.