Asit Banage
प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास हे हेड्स ऑफ स्टेट प्रीमियरमध्ये सहभागी होण्यासाठी लंडनमध्ये आले होते.
यावेळी या जोडप्याने स्टायलिश पोशाख परिधान केले होते. निक सूटमध्ये खूपच सुंदर दिसत होता,
प्रियांकाने फुल फ्रिंज ड्रेस परिधान केला होता. यामध्ये ती खुपच सुंदर दिसत होती.
काळा आणि तपकिरी रंगात येणारा हा पोशाख लक्झरी लेबलच्या फॉल २०२५ कलेक्शनमधून आहे.
१ जुलै रोजी निकने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता.
याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, “हेड्स ऑफ स्टेट प्रीमियर इन लंडन.
निकने नेव्ही शर्ट, मॅचिंग एम्ब्रॉयडरी केलेले नेव्ही पँट, हील असलेले बूट असा पोशाख परिधान केला होता.
प्रियांकाच्या या फोटोंवर कमेंटचा अक्षरश: पाऊस पडला.