पुढारी वृत्तसेवा
प्रियदर्शनीने नुकतेच आपले साडीतले फोटो शेअर केले आहेत
यामध्ये ती खूप गार्जिअस दिसत आहे, सोनेरी साडी तिने परिधान केली आहे
तिने हलक्या केशरी-गुलाबी छटांची साडी नेसली आहे. त्यावर पांढरे डिझाईन पॅटर्न दिसतात, ज्यामुळे प्रियदर्शनीचा लूक अजूनच आकर्षक झाला आहे.
लांब, मोकळे सोडलेले केस मागे वळलेले असून पारंपरिक ग्रेस दाखवतात.
कानावर घातलेली चेन-स्टाइलची मोठी कानातली इअररिंग खूप उठून दिसते. हातावर साधे पण उठावदार ब्रेसलेट आहे.
नैसर्गिक मेकअप, सौम्य भाव प्रियदर्शनीच्या लूकला अधिकच एलिगंट बनवतात
सध्या ती दशावतार या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे
तसेच सोनी मराठीवर हास्यजत्रा या शोचा नवीन एपिसोडही सध्या टेलीकास्ट होत आहे
‘दशावतार’ हा आगामी मराठी सिनेमा आहे जो सुबोध खानोलकर यांनी कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलेला आहे. हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे