पुढारी वृत्तसेवा
अभिनेत्री प्राप्ती रेडकर ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ‘सावली’ची भूमिका साकारत आहे.
तिने नुकतेच काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात तिचा पारंपरिक लूक चाहत्यांना भावला आहे.
प्राप्तीने या फोटोंसाठी आकर्षक मरून रंगाची साडी नेसली आहे.
साडीला मॅचिंग ब्लाऊज आणि हलकासा सिल्व्हर बॉर्डर तिच्या लूकला अधिकच उठावदार बनवतो.
साडीवरील बारीक नक्षीकाम तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
तिने गळ्यात चोकर नेकलेस आणि हातात बांगड्या घालून लुकला दिला आहे पारंपरिक टच दिला आहे.
तिने केसामध्ये अंबाडा बांधून त्याला गजऱ्याची जोड दिली आहे.
ही हेअरस्टाईल तिच्या लूकला आणखी पारंपरिक आणि मराठमोळं रूप देत आहे.
चेहऱ्यावरचं गोड हास्य आणि मोहक अदा यामुळे प्राप्ती अधिकच आकर्षक दिसत आहे.