मोहन कारंडे
सोनेरी रंगाच्या ड्रेसमधील प्राजक्ता माळीचा हा ग्लॅमरस लूक चाहत्यांना घायाळ करणारा आहे.
मराठमोळं सौंदर्य, वेस्टर्न टच! प्राजक्ताने हे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोला तिने 'मनातील गाणं...' असं कॅप्शन दिले आहे.
प्राजक्ताने तिच्या या मनमोहक गोल्डन लूकला पंजाबी टच देत 'Ashiqaan' या गाण्याची धून लावली आहे.
प्राजक्ताच्या या फोटोंमध्ये खास वेगळेपण जाणवतं.
प्राजक्ता एक उत्कृष्ट भरतनाट्यम नृत्यांगना आहे.
'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेत तिने साकारलेली 'मेघना देसाई' ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
अनेक चित्रपटांतून प्राजक्ताने आपली अभिनयाची छाप सोडली आहे.