पुढारी वृत्तसेवा
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतेच तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये प्राजक्ताने काळ्या रंगाचा डिझायनर आऊटफिट परिधान केला आहे.
प्राजक्ताने या फोटोंना 'बदली सी हवा हवा है कुछ न कुछ हुआ है...' या गाण्याची धून जोडली आहे.
ओढणी उडतेय, गाण्यात हवा शब्द आहे… म्हणून हे गाणं निवडलं...असं तिने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे.
प्राजक्ता नेहमीच वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटोशूट करत असते.
प्राजक्ताचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. या ग्लॅमरस अंदाजामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
अभिनयासोबतच प्राजक्ता तिच्या फॅशन सेन्स आणि मनमोहक हास्याने चाहत्यांना नेहमीच आकर्षित करत असते.