पुढारी वृत्तसेवा
अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतेच दिवाळीच्या उत्साहात न्हाऊन गेलेले खास फोटो शेअर केले आहेत.
सण-उत्सवाच्या काळात प्राजक्ता नेहमीच आपल्या मनमोहक लूकने चाहत्यांना आकर्षित करते.
या फोटोंमध्ये ती अत्यंत सुंदर गुलाबी रंगाच्या भरतकाम केलेल्या लेहेंग्यात दिसत आहे.
प्रजक्ताचा फेस्टिव्ह लूक: प्राजक्ताने गुलाबी रंगाची चोळी आणि त्याच रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.
तिने या पारंपरिक पोशाखावर झुमके, अंगठी, तसेच हातात ब्रेसलेट घालून आपला लूक पूर्ण केला आहे.
मोकळे केस आणि चेहऱ्यावरील मनमोहक हास्य तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.
फक्त सौंदर्यच नाही, तर प्राजक्ताने आपल्या पोस्टमधून एक महत्त्वाचा सामाजिक संदेशही दिला आहे.
एक चांगला नागरिक म्हणून हवा आणि आवाजाच्या प्रदूषणाची काळजी घ्या. फटाक्यांऐवजी दिव्यांनी उत्सव साजरा करा, असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.