पुढारी वृत्तसेवा
‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज' या मालिकेतील महाराणी येसूबाई अर्थात अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने आपल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे
तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे तिने "ठरलं!" असं कॅप्शन देत साखरपुड्याची घोषणा केली होती
७ ऑगस्टला साखरपूडा करणार असल्याची माहिती प्राजक्ता गायकवाडने अगोदरच दिली होती
आता साखरपुड्याचे फोटो समोर आले असून लवकरच ती बोहल्यावर चढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे
पतीचे नाव आले समोर : शंभुराज खुतवड असे प्राजक्ताच्या होणाऱ्या पतीचे नाव आहे
या सोहळ्यासाठी प्राजक्ताने ऑफव्हाईट पांढऱ्या रंगाची साडी व डिझायनर ब्लाऊज यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
याशिवाय तिने आपल्या ब्लाऊजवर शंभुराज असे एब्रॉयडरीमध्ये लिहल्याचे दिसत आहे
प्राजक्ता व शंभुराज यांनी एकत्र फोटोशूट केले आहेत यामध्ये दोघांची जोडी एमदम भारी दिसत आहे
पाच दिवसांपूर्वी प्राजक्ताने कुंकवाच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले होते. यावर अनेक सेलिब्रीटींनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता
आता त्यांच्या साखरपुड्याचे रोमँटिक फोटो व्हायरल झाले असून, ज्यात दोघेही पारंपरिक पोशाखात अतिशय आनंदी दिसत आहेत.