11 years of Poshter Boys: पोश्टर बॉईज 2 येणार? श्रेयस तळपदेची सूचक पोस्ट
अमृता चौगुले
पोश्टर बॉईज या मराठी सिनेमाला नुकतेच 11 वर्षे पूर्ण झाले यानिमित्ताने अभिनेता निर्माता श्रेयस तळपदे ने खास पोस्ट केली आहे.
आज “पोश्टर बॅाईज” या आमच्या सिनेमाला ११ वर्ष पूर्ण झाली. इतकी वर्ष “PB” वर भरभरून प्रेम केल्याबद्दल सर्व रसीक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार 🙏 तुम्हाला “PB -2” पाहायला आवडेल का? हे कॅप्शन देत त्याने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे
2023 मध्येच या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टची घोषणा झाली होती. पण त्यानंतर याबाबत कोणतीच अपडेट समोर आली नाही
आताही श्रेयसने पहिल्या भागाचे bts पोस्ट करत जुन्या आठवणीना उजाळा दिला
यामध्ये कलाकारांसह श्रेयसची पत्नी दीप्तीही या फोटोंमध्ये दिसते आहे
श्रेयसच्या या पोस्टवर अभिनेत्री पूजा सावंतने श्रेयसचे कौतुक करत आभार मानले आहेत
श्रेयसने अलीकडेच चल भाव सिटीत या रिअलिटी शोचे सूत्रसंचालन केले आहे
याशिवाय तो पुष्पा या सुपरहिट सिनेमासाठी मुख्य पात्राचा हिंदी आवाज बनला आहे
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.