पुढारी वृत्तसेवा
कोरोना महामारीनंतर तरुणांमध्ये हिप आर्थरायटिस आणि 'एव्हीएन' (AVN) यांसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण चिंताजनक रतीने वाढले आहे.
काय आहे 'एव्हीएन' (AVN)?
हा एक अत्यंत वेदनादायक आजार असून, यात कंबरेच्या हाडाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो, ज्यामुळे हाड कमकुवत होते.
तज्ज्ञांचा गंभीर इशारा
नवी दिल्लीत झालेल्या 'दिल्ली हिप ३६०' परिषदेत देशातील अस्थिरोग तज्ज्ञांनी तरुणांना या नवीन आरोग्य संकटाबाबत सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
शस्त्रक्रियेच्या मागणीत मोठी वाढ
पोस्ट-कोविड काळात तरुणांमध्ये हिप जॉईंट खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने 'टोटल हिप रिप्लेसमेंट' (सांधा बदलणे) शस्त्रक्रियांच्या मागणीत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
स्टेरॉइड्सचा अतिवापर कारणीभूत?
कोरोना उपचारादरम्यान वापरलेल्या स्टेरॉइड्सच्या अतिवापरामुळे शरीरातील रक्ताभिसरणावर परिणाम होऊन हा त्रास होत असल्याचा संशय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
तरुणांना मोठा फटका
पूर्वी वृद्धांमध्ये दिसणारे हे आजार आता तरुण आणि मध्यमवयीन भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत, ही चिंतेची बाब आहे.
लक्षणे ओळखा
कंबरेत सतत वेदना होणे, चालताना त्रास होणे किंवा सांध्यांची हालचाल मर्यादित होणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. अशा वेळी दुर्लक्ष करू नका.
वेळेवर निदान महत्त्वाचे
जर तुम्हाला कंबरेत तीव्र वेदना जाणवत असतील, तर त्वरित अस्थिरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या; वेळेवर निदान झाल्यास शस्त्रक्रियेची वेळ टळू शकते.