पुढारी वृत्तसेवा
अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तिचे चाहते कमालीचे उत्सुक आहेत.
पूनम पांडेच्या लेटेस्ट इंस्टाग्राम पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
तिच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. पूनमने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एका 'मिस्ट्री मॅन'सोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये पूनम त्या व्यक्तीच्या मिठीत दिसत आहे. एका फोटोत ती मिरर सेल्फी घेताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत दोघे एकमेकांचा हात धरून बसले आहेत.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे "हे माझे हॅप्पी स्पेस आहे."
पूनमचे फोटो पाहूण अनेकजण असा अंदाज लावत आहेत की ती पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे.
मात्र, तिने या मिस्ट्री मॅनचा चेहरा उघड केलेला नाही. त्यामुळे हा व्यक्ती नेमका कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते अधिकच उत्सुक झाले आहेत.
पूनम पांडेच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ती ३४ वर्षांची आहे. तिचे पहिले लग्न मोडले आहे.
तिने सॅम बॉम्बे सोबत २०२० मध्ये अतिशय खासगी स्वरूपात लग्न केले होते. मात्र, लग्नाच्या अवघ्या ११ दिवसांनंतर तिने पतीवर घरगुती हिंसेचे आरोप करून सर्वांना हादरवून सोडले होते.
काही काळानंतर या दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर कित्येक वर्षांनी ती पुन्हा एकदा तिच्या डेटिंग लाईफमुळे चर्चेत आली आहे.