स्वालिया न. शिकलगार
'कलर्स मराठी' वरील 'आई तुळजा भवानी' या मालिकेतील मुख्य अभिनेत्री पूजा काळे आहे
२८ जुलैला कल्याण इथे तिचा जन्म झाला असून ती भरतनाट्यम, कथ्थक नृत्यांगना आहे
ती वेस्टर्न, कुचीपुडी नृत्यदेखील करते, तिची आई राजश्री काळे या देखील नृत्यांगना आहेत
भाऊ मृदंग आणि तबला वादक आहे. तिचा १९८४ पासून नृत्याचा क्लास आहे
तुळजाभवानी मालिकेसाठी तिला तीन वेळा ऑफर आल्या होत्या. पण तिने त्या नाकारल्या
पण अखेर, मनधरणी केल्यानंतर तिने ही भूमिका स्वीकारली
भूमिकेसाठी ३५०-४०० ऑडिशन्स झाल्या, त्यातून तिची निवड झाली होती
यासाठी तिने शस्त्र प्रशिक्षण, तलवारबाजी, लांब दांड फेऱ्या शिकल्या आहेत