Pomegranate Side Effects : डाळिंब खाताय? मग सावधान! 'या' लोकांनी डाळिंबाचे सेवन टाळायलाच हवे

पुढारी वृत्तसेवा

आरोग्यासाठी गुणकारी डाळिंब

डाळिंब हे शरीरासाठी अत्यंत शक्तिवर्धक आणि पोषक मानले जाते, तरीही काही विशिष्ट आरोग्य समस्यांमध्ये त्याचे सेवन नुकसानकारक ठरू शकते.

पोषक घटकांचा खजिना

डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ‘सी’ असते, जे शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

लोहाचे मुबलक प्रमाण

या फळामध्ये लोहाचे (आयर्न) प्रमाण भरपूर असल्याने नियमित सेवनाने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वेगाने वाढते.

सुधारते रक्ताभिसरण

डाळिंब खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते आणि अवयवांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळतो.

हृदय राहते निरोगी

डाळिंब शरीरातील घातक (खराब) कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मोलाची मदत करते.

'लो बीपी'च्या रुग्णांनी राहावे सावध

कमी रक्तदाबाचा (Low BP) त्रास असणाऱ्या व्यक्तींनी डाळिंबाचे अतिसेवन टाळावे; यामुळे रक्तदाब अधिकच खालावू शकतो.

चक्कर येण्याचा धोका

रक्तदाब अचानक खूप कमी झाल्यामुळे चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे किंवा अशक्तपणा जाणवण्याचा धोका संभवतो.

अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास

बद्धकोष्ठता (कॉन्स्टिपेशन) किंवा अपचनाची समस्या असलेल्या रुग्णांनी डाळिंब खाणे टाळावे; यामुळे पचनाच्या तक्रारी आणखी वाढू शकतात.

गॅसचा तीव्र त्रास असल्यास पथ्य पाळा

गॅस किंवा पोटफुगीची तीव्र समस्या असल्यास डाळिंबातील घटकांमुळे पोटातील अस्वस्थता वाढू शकते; त्यामुळे अशा वेळी डाळिंब खाणे टाळावे, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.