Pomegranate Benefits : कर्करोग दूर ठेवण्यासाठी डाळिंब गुणकारी

पुढारी वृत्तसेवा

निसर्गात अनेक अशी फळे आहेत जी औषधांसारखीच लाभदायक असतात. त्यापैकीच एक म्हणजे डाळिंब.

डाळिंबाचा उपयोग केवळ रक्ताल्पता (ॲनिमिया) दूर करण्यासाठी होतो, असा सर्वसामान्यांचा समज आहे; परंतु याचे फायदे त्यापेक्षा कितीतरी अधिक आहेत.

कर्करोग दूर ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो, असे तज्ज्ञ सांगतात.

डाळिंबामध्ये ‌‘पुनिकालागिन‌’ आणि ‌‘अँथोसायनिन‌’ नावाचे घटक असतात.

हे घटक शरीरातील ‌‘डीएनए‌’ला नुकसान पोहोचवणाऱ्या ‌‘फ्री रॅडिकल्स‌’चा नाश करतात.

जेव्हा ‌‘डीएनए‌’ निरोगी राहतो, तेव्हा कर्करोगाच्या पेशी शरीरात वाढू शकत नाहीत.

डाळिंबाचा अर्क कर्करोगाच्या पेशींना वाढण्यापासून रोखतो, ज्यामुळे ट्यूमरचा आकार वाढत नाही.

शरीरातील जुनाट सूज हे कर्करोग होण्याचे एक मुख्य कारण असते. डाळिंबाचे सेवन शरीराची अंतर्गत सूज कमी करण्यास मदत करते.