Namdev Gharal
पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्धविधी केला जातो, ज्यामध्ये पितरांना नैवेद्य पोहोचवण्यासाठी कावळा हे प्रमुख माध्यम मानले जाते. कावळ्याला 'पितृलोकाचा संवाहक' मानले जाते
यमराजाच्या वरदानानुसार, कावळ्याला दिलेला नैवेद्य किंवा अन्न थेट यमलोकात असलेल्या पूर्वजांच्या (पितरांच्या) आत्म्याला तृप्ती देतो. त्यामुळे कावळा जेवला की पितरांचे पोट भरले आणि त्यांना शांती लाभली, अशी श्रद्धा आहे.
त्याच प्रमाणे पितृपक्षात कावळ्याला घास भरवण्यामागे काकभुशुंडी ॠषींचीही कथा आहे. रामायणातील संदर्भांनुसार अयोध्येतील 'काकभुशुंडी' हे भगवान रामाचे महान भक्त होते. त्यांना अमर राहण्याचे वरदान मिळाले होते.
काकभुशुंडीहे पहिले सामान्य माणूसच होते पण एका शापामुळे त्यांना लोमश ऋषींनी शाप दिला व त्यामुळे ते काकरुपातच राहिले काकभुशुंडींना दोन्ही लोकांमध्ये (इहलोक आणि परलोक) मुक्त संचाराची शक्ती होती.
काभुशुंडींना काल आणि मृत्यूचे भय नाही. ते भूत, वर्तमान आणि भविष्य तिन्ही काळ पाहू शकतात. पितृलोक हे पृथ्वी आणि उच्च लोकांच्या मधील सूक्ष्म जग मानले जाते. आपल्या पितरांना किंवा पुर्वजांची त्यांच्या मार्फत इच्छा पूर्ण करण्याची परंपरा सुरु झाली
काकभुशुंडींना मिळालेल्या वरदानानुसार, कावळ्याला अर्पण केलेले अन्न केवळ शारीरिक भूक भागवत नाही, तर ते सूक्ष्म तरंगांद्वारे पितरांच्या सूक्ष्म शरीरापर्यंत पोहोचते. अशी मान्यता आहे.
गरुड पुराणात कावळ्याचा संबंध यमराजाशी आणि काकभुशुंडींच्या आध्यात्मिक प्रभावाशी जोडला आहे. पितृपक्षात जेव्हा आपण 'काकबली' (कावळ्यासाठी काढलेला घास) देतो तो पितरांपर्यंत पोहोचतो अशी समजूत आहे
श्राद्धविधीत काढल्या जाणाऱ्या विशेष घासाला 'काकबलि' म्हटले जाते, ज्याद्वारे पितरांच्या आत्म्याला तृप्ती मिळावी म्हणून प्रार्थना केली जाते.
जोपर्यंत कावळा नैवेद्याला चोच लावत नाही, तोपर्यंत पितरांचे पोट भरले नाही किंवा त्यांची एखादी इच्छा अपूर्ण राहिली आहे, असा समज रूढ आहे.
त्रेतायुगात प्रभू श्रीरामांनी काकासुराला दिलेल्या वरदानामुळेही पितृपक्षात कावळ्याला अन्न अर्पण करणे अनिर्वाय मानले जाते.
काकभुशुंडींची ज्ञानपरंपरा आणि काकबलि विधी हे मानवाला स्वतःचा अहंकार सोडून निसर्ग आणि पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करायला शिकवतात.