Pineapple | अननस कोणी खावे आणि कोणी टाळावे? मधुमेहींनी काय करावे?

Namdev Gharal

अननस (Pineapple) हे फळ चवीला आंबट-गोड आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते, पण त्याचे गुणधर्म उष्ण असल्याने ते सर्वांसाठीच सारखे परिणामकारक ठरत नाही.

अननसाचे फायदेः अपचनाचा त्रास असणाऱ्यांसाठी उत्तम असते. अननसामध्ये 'ब्रोमेलेन' (Bromelain) नावाचे एन्झाईम असते, जे प्रथिने (Proteins) पचवण्यास मदत करते.

वजन कमी करणाऱ्यांसाठी: यात फायबर जास्त आणि कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे भूक नियंत्रित राहते.

हाडांची दुखणी असणाऱ्यांसाठी : मॅंगनीजचे प्रमाण जास्त असल्याने हाडांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी अननस फायदेशीर आहे.

सूज कमी करण्यासाठी: शरीराच्या कोणत्याही भागावर सूज असल्यास किंवा सांधेदुखी (Arthritis) असल्यास ब्रोमेलेनमुळे ती कमी होण्यास मदत होते.

अननस यांनी खाऊ नयेः गर्भवती महिला: गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात (पहिले ३ महिने) अननस खाणे टाळावे. यातील ब्रोमेलेन हे गर्भाशयासाठी जोखमीचे ठरू शकते

ऍसिडिटीचा त्रास असणारे: अननस निसर्गतः आम्लयुक्त (Acidic) असते. ज्यांना वारंवार छातीत जळजळ किंवा तीव्र ऍसिडिटीचा त्रास होतो, त्यांनी हे फळ टाळावे किंवा कमी प्रमाणात खावे.

मधुमेही रुग्ण : अननसाचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' मध्यम असतो आणि त्यात नैसर्गिक साखर जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते.

ऍलर्जी असल्यास: काही लोकांना अननस खाल्यावर ओठ, जीभ किंवा घशाला खाज येते. अशा लोकांनी ते खाणे टाळावे.

रक्त पातळ होण्याची औषधे घेणारे: ब्रोमेलेनमध्ये रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात. जर तुम्ही आधीच रक्ताशी संबंधित औषधे घेत असाल, तर अननसाचे अतिसेवन टाळावे.

रोज एक लिंबू