पुढारी वृत्तसेवा
कबुतर हे घराची बाल्कनी, पत्रा, टेरेस, बाथरूम किंवा टॉयलेटच्या छोट्या जागेत घर करतात.
कबुतर हे गटाने राहत असल्याने ते सर्वत्र घाण करतात. त्यांची विष्ठा मानवी आरोग्यासाठी घातक असते.
कबुतर उंचावरील घरांच्या गॅलरीत, माळ्यावर घुसतात. तसेच त्यांचा विशिष्ट आवाज आणि पंखांची फडफड आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकते.
अशा या कबुतरांना आपल्या घरापासून दूर ठेवण्यासाठी काही टिप्स वापरून पाहता येतील.
कबुतरांना दूर ठेवण्यासाठी आरशासारखी चमकदार वस्तू, ॲल्युमिनियम फॉईल्, जुनी सीडी अडकवू ठेवू शकतो. ज्यामुळे त्यांच्यात संभ्रम निर्माण होईल.
घराच्या गॅलरीत किंवा लाफ्ट, पोटमाळे यांना बारीक जाळ्या लावून त्या बंदीस्त करण्याचा उपाय करता येईल, ज्यामुळे हा कायमचा उपाय ठरेल.
कबुतरांना तीव्र वास आवडत नाही. व्हिनेगर, लसुण किंवा कांद्याचा रस मिसळून घराच्या गॅलरी, बाल्कनीत स्प्रे करा. कबूतर पुन्हा येणार नाहीत.
प्रभावी उपाय म्हणजे बाल्कनीत, एसी कॅबिनेटवर, रेलिंगवर बर्ड स्पाइक्स बसवा. कबुतरांना बसता न आल्याने ते येणे बंद करतील.
कॅक्टस सारखी काटेरी झाडे तुम्ही बाल्कनीत ठेवा, त्यांच्या काट्यांना कबुतर घाबरतात. पुन्हा तेथे बसणे कबुतर टाळातात.
कबुतर उघडे बॉक्स, कचरा पेटीतील कचरा बाहेर काढून सर्वत्र पसरवतात. त्यामुळे नको असलेल्या वस्तू घरात ठेवू नका.