Mental Health and Posture : मोबाईल वापरण्याची 'ही' पद्धत वाढवतेय तुमची चिंता; तज्ज्ञ काय सांगतात?

पुढारी वृत्तसेवा

प्रसिद्ध कायरोप्रॅक्टर डॉ. सुझी शुलमन यांच्या मते, चुकीच्या पद्धतीमुळे (Poor Posture) लोकांमध्ये चिंता( अँक्झायटी) वाढतेय.

जे लोक सतत वाकून चालतात किंवा बसतात, त्यांच्यामध्ये नैराश्य (Depression) आणि थकवा जास्त जाणवतो.

संशोधनानुसार, जेव्हा व्‍यक्‍ती खांदे पाडून बसतो, तेव्हा मेंदूला नकारात्मक संकेत मिळतात आणि आत्मविश्वास कमी होतो.

वाकून बसल्याने शरीरातील रक्ताभिसरण, श्वास घेण्याची पद्धत आणि हार्मोन्स बिघडतात, ज्यामुळे मानसिक ताण वाढतो.

केवळ २ ते ३ मिनिटे चुकीच्या पद्धतीत बसल्यानेही मूड खराब होऊ शकतो. हे मन आणि शरीराचे एक धोकादायक चक्र आहे!

मोबाईल वापरताना मान सरळ रेषेत असावी. गरज पडल्यास हाताखाली उशीचा आधार घ्या.

तासनतास एकाच जागी बसू नका; दर अर्ध्या तासाने स्ट्रेचिंग करा आणि ताठ उभे राहा.

मान सरळ ठेवणारे व्यायाम (Chin Tucks) आणि खांदे पाठीमागे ओढून 'प्राउड पोझिशन' घेतल्याने त्वरित आत्मविश्वास वाढतो.

तज्ज्ञांच्‍या मते जाणीवपूर्वक ताठ बसल्याने मेंदूला सकारात्मक संकेत मिळतात, ज्यामुळे तुमची मज्जासंस्था आणि मूड दोन्ही सुधारतात!

येथे क्‍लिक करा.