Namdev Gharal
आयफोने नुकताच त्यांचा फोल्डेबल फोन लॉन्च केला आहे याची किंमत भारतात जवळपास ३ लाखांपर्यत जाते पण आज या आयफोनपेक्षाही दहा पट महाग असलेल्या फोनबद्दल माहीती जाणून घेऊया
हा फोन आहे VERTU या लक्झरी ब्रँडचा कस्टमाईज फोल्डेबल फोन, हा सामान्य स्मार्टफोन नाही. याची किंमत तब्बल ३६ लाख रुपयापर्यंत जाते ($४०,००० डॉलर) तो महागड्या आयफोनपेक्षा जवळपास १० पटीने अधिक महाग आहे.
VERTU इंग्लडमधील कंपनी असून या फोनच्या बांधणीत मगरीचे लेदर, १८-कॅरेट सोन्याचे फिनिशिंग आणि हिऱ्यांचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक फोन हा हाताने (Handcrafted) तयार केला जातो.
फोनमध्ये 'हरमिस' (Hermes AI) नावाचा प्रगत ऑन-डिव्हाइस एआय असिस्टंट आहे, जो केवळ तुमच्या व्हॉइस कमांडवर ८० पेक्षा जास्त अॅप्स आणि व्यावसायिक टूल्स चालवतो.
या फोनमधील सर्व एआय ऑपरेशन्स आणि डेटा अंतर्गतरीत्या चिपसेटवर प्रोसेस होतात. कोणताही डेटा बाहेरील क्लाउड किंवा सर्व्हरवर पाठवला जात नाही.
दुर्गम पर्वत, निर्मनुष्य बेट किंवा समुद्रातील यॉटवर असलात तरीही फोन संपर्कात राहतो; कारण यामध्ये थेट सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट देण्यात आला आहे.
'कॉनकॉर्ड' बटण : एआय एखादे काम करू शकले नाही, तर केवळ एका बटणावर २४/७ खऱ्या माणसाची लक्झरी सेवा उपलब्ध होते.
कॉनकॉर्ड सेवेला फक्त "उद्या पॅरिसला जायचे आहे" सांगा; खासगी फ्लाइट बुकिंग, फाईव्ह-स्टार हॉटेल आणि व्हीआयपी टेबल रिझर्व्हेशनचे काम ती टीम स्वतः पूर्ण करते.
या लक्झरी फोनमध्ये प्रीमियम फोल्डेबल अमोलेड (OLED) स्क्रीन, फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि हाय-एंड कॅमेरा सिस्टिम दिली आहे, जी मल्टीटास्किंग अत्यंत सोपी करते.
फोनच्या स्क्रीन संरक्षणासाठी अत्यंत मजबूत नीलम खडक (Sapphire Crystal) ग्लास वापरली जाते, ज्यावर Scratches पडतच नाहीत
हा फोन केवळ कॉलिंग किंवा इंटरनेटसाठी नसून, अब्जाधीश आणि व्हीआयपी वर्गासाठी एक चालता-बोलता स्टेटस सिम्बॉल मानला जातो.
या फोनमधील बेस मॉडेल्स ४ ते ७ लाख रुपयापर्यंत जातात : यामध्ये सोन्याऐवजी टायटॅनियम किंवा सिरॅमिक फ्रेम आणि मगरीच्या कातडीऐवजी साधे लेदर वापरलेले असते.