पुढारी वृत्तसेवा
तुमचा स्मार्टफोन वारंवार गरम होतोय का? सावधान! याकडे दुर्लक्ष केल्यास मोठा धोका होऊ शकतो.
आजच्या काळात मोबाईलशिवाय पान हलत नाही, पण ओव्हरहीटिंगमुळे फोनचा परफॉर्मन्स आणि बॅटरी दोन्ही खराब होतात.
फोन गरम होऊ लागताच बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेले विनाकारण ॲप्स त्वरित बंद करा. यामुळे प्रोसेसरवरचा ताण कमी होईल.
अनेकदा जाड कव्हरमुळे उष्णता बाहेर पडत नाही. फोन हिट झाल्यावर कव्हर काढून ठेवल्याने तो लवकर थंड होतो.
थेट सूर्यप्रकाश फोनच्या बॅटरीसाठी घातक असतो. कडक उन्हात मोबाईल वापरणे टाळा, सावलीत फोन वापरा.
जुन्या सॉफ्टवेअरमधील बग्समुळे फोन हँग आणि गरम होतो. त्यामुळे सिस्टिम नेहमी अपडेट ठेवा.
चार्जिंग सुरू असताना गेमिंग किंवा कॉलिंग केल्याने बॅटरी गरम होऊन ब्लास्ट होण्याचा धोका वाढतो.
स्क्रीनचा जास्त ब्राइटनेस सुद्धा बॅटरीवर ताण देतो. शक्य असल्यास ब्राइटनेस कमी ठेवा किंवा 'ॲटो-ब्राइटनेस' मोड वापरा.
नेहमी फोनसोबत आलेल्या ओरिजिनल चार्जरचाच वापर करा. स्वस्त किंवा लोकल चार्जरमुळे फोन हीट होतो.