पुढारी वृत्तसेवा
पेट्रोलच्या किंमती सातत्याने वाढत असल्याने मोटारसायकलचे चांगले मायलेज मिळवणे आता काळाची गरज बनली आहे
बाईक चालविण्याची पद्धत आणि नियमित देखभाल हे साधे बदल केल्यास लिटरमागे अधिक किलोमीटरचा प्रवास करता येऊ शकतो
बाईक ४० ते ५५ किमी प्रतितास या वेगात चालवा, जास्त वेगाने चालवल्यास वाऱ्याचा प्रतिकार वाढून इंजिनला अधिक मेहनत घ्यावी लागते
विनाकारण वारंवार गिअर बदलणे टाळा. सतत गिअर बदलल्याने इंधनाचा अपव्यय होतो आणि इंजिनवर अतिरिक्त भार पडतो
अचानक वेग वाढवणे आणि जोरात ब्रेक लावणे यामुळे इंधनाचा वापर अधिक होतो, स्मार्ट पद्धतीने बाइक चालवल्यास मायलेज वाढण्यास मदत होते
वाहतूक सिग्नलवर किंवा अन्यत्र ३० सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबावे लागणार असल्यास इंजिन बंद करणे फायदेशीर ठरते
टायरमध्ये हवा कमी असल्यास रस्त्यावर घर्षण वाढून बाइक पुढे नेण्यासाठी इंजिनला अधिक शक्ती वापरावी लागते आणि मायलेज कमी होते
बाइकवर जास्त वजन असल्यास इंजिनला अधिक मेहनत घ्यावी लागते आणि मायलेज कमी होते, हाफ-क्लचवर बाइक चालवणे टाळा. त्यामुळे इंजिनवर अतिरिक्त ताण येतो
एअर फिल्टर ६ ते ८ हजार किमी अंतरानंतर स्वच्छ करा किंवा बदला, इंजिन ऑइल वेळेवर बदला, चेन स्वच्छ करून लुब्रिकेशन करा