Petrol- Diesel Rate System India : पेट्रोल-डीझेल महाग का होते? भारतात दर कसे ठरतात?

Asit Banage

भारतात केंद्र सरकारकडून नुकतीच पेट्रोल-डिझेलची दरवाढ जाहीर करण्यात आली.पण ही दरवाढ कशी होते माहित आहे का ?

पेट्रोल - डीझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता अपडेट होतात. भारत 85% पेक्षा जास्त कच्चे तेल आयात करतो.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले की पेट्रोल- डीझेल महागते.

भारतात Indian Oil Corporation, Bharat Petroleum आणि Hindustan Petroleum या कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजार आणि करांच्या आधारे पेट्रोल-डीझेलचे दर निश्चित करतात.

डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला तर आयात खर्च वाढतो.

केंद्राचा उत्पादन शुल्क दरात जोडला जातो.

राज्य सरकार त्यावर व्हॅट आकारते.

वाहतूक खर्च आणि डीलर कमिशन जोडले जाते. तसेच जागतिक घडामोडींचाही पेट्रोल- डीझेलच्या दरांवर प्रभाव असतो.

Pinterest
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...