Healthy Tips: सतत थकवा जाणवतोय? 'ही' असू शकतात ५ मुख्य कारणं
पुढारी वृत्तसेवा
कष्टाचं काम न करताही शरीरात उत्साह जाणवत नाहीये? तुम्ही एकटे नाही आहात! गेल्या ५-७ वर्षांत अशा तक्रारी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
Mental Stress
चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स किंवा सिगारेट-तंबाखू यामुळे तात्पुरतं फ्रेश वाटतं. पण, दीर्घकाळात या गोष्टी शरीराला आतून अशक्त करतात. मोबाईलचं व्यसनही शरीराला विश्रांती घेऊ देत नाही.
Canva
सकाळचा नाश्ता टाळणे किंवा सतत जंक फूड खाण्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. पोषणतत्त्वांच्या अभावामुळे शरीर लवकर थकून जातं.
Breakfast
सततचा थकवा हा अॅनेमिया (रक्तक्षय), थायरॉईड, मधुमेह किंवा हाय बीपी यांसारख्या आजारांचे लक्षण असू शकतं. अशा वेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे.
Canva
शरीराला दररोज ७-८ तासांच्या शांत झोपेची गरज असते. उशिरापर्यंत मोबाईल पाहणे किंवा चुकीच्या वेळांमुळे झोप पूर्ण होत नाही, ज्यामुळे सकाळी उठल्यावरही थकवा जाणवतो.
sleep | file photo
सततची स्पर्धा आणि टेन्शनमुळे केवळ मनच नाही, तर शरीरही थकतं. मानसिक स्वास्थ्य ठीक नसेल, तर शरीरात उत्साह राहत नाही.
Canva
दिवसभरात पुरेसे पाणी न प्यायल्याने शरीरात डिहायड्रेशन होतं. यामुळे निरुत्साह आणि सुस्ती जाणवू लागते.
warm drinkinng water
रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा.
Sleep Tips | file photo
दररोज संतुलित आणि घरचा आहार घ्या.
healthy dinner time | AI photo
मानसिक शांततेसाठी दररोज किमान ३० मिनिटे ध्यान करा.