Persistent bloating: सतत पोट फुगण्याचा त्रास होतोय? 'हे' गंभीर कारण तर नाही ना!

पुढारी वृत्तसेवा

आहारापेक्षा हार्मोन्स जबाबदार?

रोज पोट फुगणे ही केवळ पचनाची समस्या नसून अनेकदा हार्मोनल असंतुलनमुळे असू शकते.

इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण बिघडल्यास शरीरात पाणी साचून राहते.

अन्न पोटात जास्त वेळ राहते?

हार्मोन्सच्या बदलांमुळे पचनसंस्थेचा वेग मंदावतो.

यामुळे पोटात गॅस होणे, जडपणा येणे आणि संध्याकाळी पोट खूप फुगल्यासारखे वाटणे असा त्रास होतो.

मानसिक ताणतणाव

ताण वाढल्यास शरीरात 'कोर्टिसोल' हार्मोन वाढतो.

यामुळे आहार बदलला नसला, तरीही ताणतणावाच्या दिवसांत पोट फुगण्याची समस्या वाढते.

जेवताना 'या' गोष्टी पाळा

अन्न नेहमी हळूहळू आणि व्यवस्थित चावून खा.

रात्री उशिरा जास्त प्रमाणात किंवा जड जेवण करणे टाळा.

'या' पदार्थांवर नियंत्रण ठेवा

आहारात जास्त मीठ आणि प्रक्रिया केलेले अन्न कमी करा.

यामुळे शरीरात पाणी साचून राहण्याचे प्रमाण कमी होते.

उपाय - जेवणानंतर छोटी शतपावली

जेवल्याबरोबर एकाच जागी बसून राहणे टाळा. जेवणानंतर रोज किमान १० मिनिटे हलकी शतपावली करा, यामुळे पचन सुधारते.

file photo

महत्त्वाचा सल्ला

तुमच्या मासिक पाळीच्या चक्रासोबत आणि स्ट्रेस लेव्हलसोबत या त्रासाची नोंद ठेवा. यामुळे पोट फुगण्यामागील नेमके कारण समजणे सोपे जाईल.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जर पोट फुगण्यासोबत तीव्र वेदना, अनियमित पाळी, त्वचेतील बदल किंवा खूप थकवा जाणवत असेल. तर याकडे दुर्लक्ष न करता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.