Perfect Photo | या फोटोंचे टायमिंग इतके फरफेक्ट की डोळ्यांवर विश्वास बसणार नाही!

Namdev Gharal

काही फोटोंच टायमिंग इतके परफेक्ट असतात की आपला डोळ्यांवर विश्वास बसत नाही, कारण अगदी घटना घडल्या घडल्या ते क्लिक झालेले असतात. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची मशाल व आकाशात चमकलेली विज हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

इन्स्टाग्रामवर असे भन्नाट फोटो व्हायरल होत असतात. आता एका इमारतीच्या बरोबर वरुन विमान उडत असताना कॅप्चर केलेला फोटो creepy.fact या पेजवरुन हे फोटो अपलोड केले आहेत.

काही वेळा हे AI ने तयार केलेले फोटो वाटू शकतात. पण काही फोटोग्राफर पूर्ण मेहनतीने हे फोटो क्लिक करतात. चंद्रालाच बास्केटमध्ये ढकलणारा खेळाडू

ग्लासवर बसलेला मुंगळा व त्‍याचक्षणी हवेतून जाणारे हेलिकॉप्टर, काही फोटोग्राफर असे फोटो ठरवूनही काढतात. त्‍यासाठी ते तासन तास वाटही पाहतात.

संध्याकाळी सूर्य अस्ताला जात असताना ढगांनी अवकाशात केली दाटी, याचवेळी सूर्याच्या चेहऱ्यावर उमटलेली ‘स्माईल’

एका क्रेनचे काम सुरु असताना चंद्र आकाशात होता. जणू चंद्राला उचलून दुसरीकडे ठेवले जात आहे. हा फोटो फोटोग्राफरचे स्कील आहे.

ढंगामध्ये चमकणारी विज, प्रकाश व ढगांचा खेळ विमानातून अचूकपणे टिपला आहे

हे दोन पक्षी आकाशातील चंद्रकोरीला आपल्या चोचीत धरुन घरट्याकडे घेऊन जात आहेत.

युनाएटेड नेशनचा एक शांती सैनिक युनायटेड नेशनच्या बोर्डजवळ असा उभारला आहे की त्‍याच्या टोपीवरील UN ही अक्षरे ‘युएन इनव्हॉल्वड इन पिस’ असा संदेश देत आहेत.