Baby Eye Care: डॉक्टर बाळाच्या डोळ्यात काजळ न घालण्याचा सल्ला का देतात?

Anirudha Sankpal

आपल्या घरातील जुनी लोकं म्हणजे आजी आई नवजात बाळाच्या डोळ्यात काजळ घालतात.

मात्र आताचे बालरोग तज्ज्ञ डोळ्यात काजळ घालणे, टाळूवर तेल घालणे, तेलाने मालीश करणे या जुन्या पद्धतींना विरोध का करत आहेत.

काजळ लावल्याने डोळे मोठे होतात हा केवळ एक गैरसमज आहे; डोळ्यांचा आकार हा अनुवांशिक घटकांवर अवलंबून असतो.

जर काजळामुळे डोळे मोठे झाले असते, तर चीन किंवा जपानमधील लोकांचे डोळे बारीक राहिले नसते.

डोळ्यातील पाणी नाकात वाहून नेणारी 'नेझोलॅक्रिमल डक्ट' (Nasolacrimal Duct) काजळामुळे ब्लॉक होऊ शकते.

ही वाहिनी बंद झाल्यामुळे बाळाच्या डोळ्यातून सतत पाणी येणे आणि जंतूसंसर्ग (Infection) होण्याचा धोका वाढतो.

अनेकदा काजळामध्ये शिसे (Lead) सारखे घातक धातू असतात, जे बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक ठरतात.

डॉक्टरांनी त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये अशा अनेक केसेस पाहिल्या आहेत, जिथे घरगुती उपायांमुळे बाळाला गंभीर इजा झाली आहे.

तुमच्या बाळाला अशा वेदना आणि संसर्गापासून वाचवण्यासाठीच डॉक्टर पारंपरिक गोष्टी टाळण्याचा सल्ला देतात.

येथे क्लिक करा