Parijat Health benefits: पारिजातकाच्या फुले आणि पानांचे चमत्कारिक फायदे!

पुढारी वृत्तसेवा

पारिजातकाची पांढऱ्या रंगाची फुले नाजुक असून सुवासिक असतात. प्रातःकाळी या फुलांचा झाडाखाली सडा पडलेला दिसतो. फुले फार काळ टिकून राहात नाहीत.

आमवातात : पानांचा मंदाग्नीवर केलेला काढा देतात.

कोणत्याही वात विकारात: ऊन पाणी घालून वाटलेल्या पानांचा १० मिली रस, १० मिली आल्याचा रस व गोडीस खडीसाखर घालून दिवसातून दोन वेळा देतात.

ताप : पारिजातकाच्या पानांचा काढा किंवा रस द्यावा.

सांधदेदुखीत : पाने वाटून थोडी गरम करून ठेचून गरम गरम सांध्यावर बांधावी.

हिवताप : पाने ठेचून त्यात गूळ घालून सुपारीएवढ्या गोळ्या तयार कराव्यात. हिवताप भरून येण्याच्यापूर्वी ४ तास एक गोळी खाण्यास द्यावी.

कफ, दमा : सालीचे चूर्ण नागवेलीच्या पानांच्या रसातून दिवसातून ३-४ वेळा द्यावे. सालीचे चूर्ण विड्यातून खाण्यास देण्याने कफ पातळ होऊन आराम पडतो.

जंत : मोठ्या माणसांना जंत झाल्यास पानांच्या १० ग्रॅम रसात साखर घालून दिवसातून २ वेळा द्यावा. लहान मुलांना हाच रस अर्ध्या प्रमाणात द्यावा.

गजकर्ण : पाल्याचा रस काढून रोज चोळावा.

पोटदुखीत : पाला वाटून त्याची गोळी करून खावयास द्यावी व वाटलेल्या पाल्याचा ओटी पोटावर लेप करावा.