पुढारी वृत्तसेवा
सत्य महत्त्वाचे, पण सुरक्षितता अधिक महत्त्वाची
मुलांना नेहमी सत्य बोलायला शिकवा, पण काही प्रसंगी स्वतःचे रक्षण करण्यासाठी सावधपणे उत्तर देणेही गरजेचे असते.
घरात आई-वडील आहेत असे सांगा
अनोळखी व्यक्तीने विचारले की आई-वडील घरी आहेत का, तर “मी एकटाच/एकटीच आहे” असे सांगू नये.
“मी आई-बाबांना बोलावतो” हे वाक्य शिकवा
मुलांनी सांगावे, “हो, आई-बाबा घरी आहेत, मी त्यांना बोलावतो.” यामुळे समोरच्याचा गैरसमज होऊन धोका कमी होऊ शकतो.
अनोळखींकडून वस्तू घेऊ नका
चॉकलेट, खेळणी किंवा भेटवस्तू देणाऱ्या अनोळखी व्यक्तींपासून सावध राहायला मुलांना शिकवा.
“माझे आई-बाबा जवळच आहेत” असे सांगा
कोणी काही देण्याचा आग्रह करत असेल तर मुलांनी आत्मविश्वासाने हे उत्तर द्यावे.
लिफ्ट किंवा वाहनाची ऑफर नाकारायला शिकवा
अनोळखी व्यक्तीने सोडण्याची ऑफर दिल्यास “माझे आई-बाबा मला घेण्यासाठी येत आहेत” असे सांगून दूर व्हावे.
वैयक्तिक माहिती गुप्त ठेवा
नाव, शाळा, घराचा पत्ता किंवा फोन नंबर अनोळखी व्यक्तींना सांगू नये, हे मुलांना समजावून सांगा.
संशयास्पद परिस्थितीत मदत मागा
धोका वाटल्यास मोठ्याने ओरडणे, आसपासच्या लोकांचे लक्ष वेधणे आणि सुरक्षित ठिकाणी जाणे शिकवा.
“ही गोष्ट आई-बाबांना सांगू नको” ऐकले तर लगेच सांगा
कोणीही गोष्ट गुप्त ठेवण्यास सांगितल्यास ती घरी येऊन पालकांना नक्की सांगावी, असा विश्वास मुलांमध्ये निर्माण करा.