Curd making tips: विरजणशिवाय घट्ट दही कसं लावायचं? गृहिणींसाठी अत्यंत सोप्या अन् भन्नाट ट्रिक्स

पुढारी वृत्तसेवा

घरात विरजण संपले आहे आणि दही लावायचे आहे? आता अजिबात काळजी करू नका!

curd | pudhari

कोमट दुधात २-३ हिरव्या मिरच्या देठासहित टाकल्यास दुधाचे उत्तम दही बनते.

मिरचीच्या देठामध्ये विशिष्ट प्रकारचे नैसर्गिक एन्झाइम्स असतात, जे दूध आंबवण्यास मदत करतात.

मिरची उपलब्ध नसेल, तर कोमट दुधात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकूनही दही लावता येते.

हिरव्या मिरचीप्रमाणेच लाल सुक्या मिरचीचा वापर करूनही घट्ट दही सहज तयार होते.

दही लावताना दूध जास्त गरम किंवा जास्त थंड नसावे, ते केवळ योग्य प्रमाणात कोमट असावे.

दूध व्यवस्थित झाकून ६ ते ८ तास एखाद्या उबदार ठिकाणी (उदा. बंद ओव्हन किंवा कॅसरोलमध्ये) ठेवावे.

मग आजच 'हा' भन्नाट जुगाड वापरा आणि विरजणाशिवाय मिळवा हॉटेलसारखं घट्ट आणि मलाईदार दही!

येथे क्लिक करा....