Namdev Gharal
उदमांजरे see otter हा पाण्याच्याकाठी राहणार प्राणी, पोहण्याची प्रचंड क्षमता, मासे पकडण्याचे कसब हे या प्राण्याचे वैशिष्ट्ये, पण याच उदमांजरांना पाळून बांगला देशात त्यांच्याकरवी मासेमारी केली जाते.
बांगलादेशातील उदमांजरांच्या साहाय्याने मासेमारी करण्याची ही पद्धत पिढ्यानपिढ्या चालत आलेली असून ती सुमारे २०० ते २५० वर्षांपेक्षा जुनी मानली जाते.
ही अनोखी मासेमारी प्रामुख्याने बांगलादेशातील दक्षिणेकडील नडाईल (Narail) आणि खुलना (Khulna) जिल्ह्यांमधील नद्या आणि खाड्यांच्या प्रदेशात पाहायला मिळते.
वापरली जाणारी प्रजाती: या मासेमारीसाठी प्रामुख्याने गुळगुळीत केसांचे उदमांजर (Smooth-coated otter ) पाळले आणि प्रशिक्षित केले जातात. या मच्छिमारांची मासे पकडण्याची कलाही खास असते
उदमांजरांच्या गळ्यात दोर बांधला जातो त्यांना पाण्याच्या कडेला सोडले जाते. ते खोल पाण्यात उतरुन माशांना घाबरवतात व नावेकडे हाकलात याचवेळी मच्छिमार जाळे पाण्यात सोडतात व मासे यात अलगत येतात
यासाठी खास प्रशिक्षण उदमाजंराना दिले जाते ते पाण्यात पोहून वनस्पतींमध्ये आणि खोलवर लपलेल्या माशांना मच्छीमारांच्या जाळ्याच्या दिशेने हाकलतात.
मासेमारी करताना पूर्ण वाढ झालेल्या उदमांजरांच्या शरीरावर दोरी बांधलेली असते, ज्याचे नियंत्रण नावेवर बसलेल्या मच्छीमाराकडे असते. यामुळे उदमांजर सुरक्षित राहतात आणि जाळ्याच्या दिशेनेच पोहतात.
उदमाजंराच्या लहान पिल्लांना मोकळे सोडले जाते. ती आपल्या आई-वडिलांसोबत पाण्यात पोहतात आणि नकळत मासे जाळ्यात हाकलण्याचे कौशल्य शिकून घेतात.
रात्रीच्या वेळी मासेमारी: ही मासेमारी प्रामुख्याने रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या अंधारात केली जाते. रात्री शांत पाण्यात मासे जाळ्यात येण्याची शक्यता सर्वाधिक असते.
उदमांजरांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपले जाते. पकडलेल्या ताज्या माशांमधील एक मोठा वाटा त्यांना दररोज खाण्यासाठी दिला जातो.
आधुनिक जाळी, इंजिनबोटी आणि इतर मासेमारीच्या साधनांमुळे तसेच नद्यांचे वाढते प्रदूषण, अति-मासेमारी आणि उदमांजरांच्या आहाराचा वाढता खर्च यामुळे ही परंपरा वेगाने लोप पावत आहे.
एकेकाळी हजारो कुटुंबे यावर अवलंबून होती, मात्र आता मोजकीच कुटुंबे ही परंपरा जिवंत ठेवून आहेत. त्यामुळे पर्यावरणशास्त्रज्ञ आणि वन्यजीव संशोधक या पारंपारिक पद्धतीचे जतन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.