पुढारी वृत्तसेवा
कांदा पोहे हा महाराष्ट्रासह मध्य आणि पश्चिम भारतात अत्यंत लोकप्रिय असलेला नाश्त्याचा पदार्थ आहे.
पोहे चविष्ट, झटपट तयार होणारे आणि ऊर्जा देणारे असले तरी, अनेक व्यक्तींना खाल्ल्यानंतर पचनाच्या समस्या, विशेषतः पित्त किंवा छातीत जळजळ जाणवते.
पोहे खाल्ल्यानंतर पित्त वाढण्याचे मूळ कारण पोह्यांपेक्षा त्यातील कांदा आणि पाककृतीतील इतर उष्ण घटक (उदा. जास्त तेल, शेंगदाणे) असतात.
पोह्यामध्ये चिरलेला कच्चा कांदा वापरण्यापूर्वी किमान दहा मिनिटे थंड किंवा बर्फाच्या पाण्यात भिजवावा. फोडणीमध्ये तो पूर्णपणे शिजवाव किंवा हलका लाल रंग येईपर्यंत भाजावा.
पोह्यामध्ये हिंग घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हिंग नैसर्गिकरित्या पचन सुधारते.
शेंगदाणे हे उष्ण असल्याने, पित्त असणाऱ्या व्यक्तींनी ते थेट तेलात तळण्याऐवजी, आदल्या रात्री भिजवून, नंतर तेलात हलके परतून पोह्यात मिसळावेत.
लिंबू रस अत्यंत ॲसिडिक असला तरी, तो योग्य प्रमाणात वापरल्यास ॲसिडिटी ट्रिगर करत नाही.
जेवणानंतर बडीशेप खातो तसे नाश्त्यानंतरही खाल्यास पचन सुधारते आणि जठरात आम्ल उत्पादन नियंत्रित होते.