रणजित गायकवाड
जगभरातील फुटबॉलप्रेमी आतुरतेने वाट पाहत असलेल्या २०२६ फिफा विश्वचषकाचे बिगुल वाजायला आता केवळ एक वर्षाचा अवधी शिल्लक आहे.
ही विश्वचषक स्पर्धा आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी ठरणार आहे. यात प्रथमच ४८ संघ सहभागी होणार आहेत.
फुटबॉलच्या या महाकुंभाचे आयोजन उत्तर अमेरिकेतील तीन देश संयुक्तपणे करणार असून, अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथील १६ प्रतिष्ठित मैदानांवर हे सामने रंगणार आहेत.
या ऐतिहासिक स्पर्धेसाठी यजमान शहरे आणि मैदाने निश्चित झाली आहे. त्यांची आसनक्षमता जाणून घ्या...