Kids Reels Addiction: एक मोबाईल सेटिंग अन् मुलांचे मोबाईल व्यसन झटक्यात सुटणार

Anirudha Sankpal

मुलांची स्क्रीन आणि रील्स-शॉर्ट्सचे व्यसन पालकांसाठी चिंतेचा विषय बनला असून, सलग येणाऱ्या छोट्या व्हिडिओंमुळे मुले अभ्यास आणि इतर महत्त्वाची कामे बाजूला ठेवतात.

यावर प्रत्येक वेळी रागावण्याऐवजी किंवा फोन लपवण्याऐवजी यूट्यूबमधील खास सेटिंगचा वापर करून शॉर्ट्स पाहण्याचा वेळ सहज नियंत्रित करता येतो.

यासाठी वेगळे कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करण्याची गरज नसून थेट यूट्यूब अ‍ॅपच्या सेटिंग्समध्ये जाऊन बदल करता येतो.

सर्वात आधी फोनमधील यूट्यूब अ‍ॅप उघडून स्क्रीनवर दिसणाऱ्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा आणि त्यानंतर 'सेटिंग्ज' (Settings) पर्यायावर जा.

सेटिंग्जमध्ये गेल्यावर 'टाइम मॅनेजमेंट' (Time Management) हा पर्याय निवडा, जिथे व्हिडिओ पाहण्याचा वेळ मर्यादित करण्याचे पर्याय उपलब्ध असतात.

पुढे 'डेली लिमिट' किंवा 'शॉर्ट्स फीड लिमिट' (Shorts Feed Limit) मध्ये जाऊन शॉर्ट्स पाहण्याची दैनंदिन मर्यादा निश्चित करता येते.

या सेटिंगमध्ये ० मिनिटांपासून ते २ तासांपर्यंतचा वेळ निवडण्याची सुविधा असून, गरजेनुसार कमी वेळ सेट केल्यास स्क्रोलिंगवर नियंत्रण राहते.

Mental Health | pinterest

वेळ निवडल्यानंतर सेटिंग त्वरित लागू होते, ज्यामुळे मुलांना वारंवार फोन ठेवण्यास सांगावे लागत नाही.

Children lying frequently | Pudhari
येथे क्लिक करा