Onagadori : या राजेशाही कोंबड्याची शेपूट असते २० ते ३० फूट लांब!

पुढारी वृत्तसेवा

जपान (कोची प्रांत) या ठिकाणची मुळ असलेली एक कोंबडीची प्रजाती म्हणजे ओनागादुरी Onagadori जापानी भाषेत 'ओनागादोरी'चा अर्थ "लांब शेपटीचे पक्षी" असा होतो.

या प्रजातीतील कोंबड्याची लांबी असते जवळपास २० फूटापर्यंत, ही जगातील सर्वात लांब शेपटी ठरते, सरासरी लांबी ५ ते ६ मीटर (१६ ते २० फूट) असते

ही पक्षी जगतातील सर्वात लांब शेपटी ठरते कारण योग्य योग्य संगोपन केल्यास ही शेपटी १० ते १२ मीटर (३० ते ४० फूट) पर्यंत वाढू शकते. दरवर्षी याची लांबी ३ फुटांपर्यंत वाढते

योग्य काळजी आणि निगा राखल्यास ओनागादोरी ५ ते ८ वर्षे जगतात काही खास परिस्थितीत १० वर्षांपर्यंत आयुष्य असू शकते

या प्रजातीच्या नरांमध्ये (कोंबड्यांमध्ये) 'Non-molting' (पिसे न गळणारे) हे खास जनुक असते. त्यामुळे इतर कोंबड्यांप्रमाणे यांची शेपटीची पिसे वर्षातून एकदा गळून पडत नाहीत, तर ती सतत वाढत राहतात.

ही मांस किंवा अंड्यांसाठी वापरली जाणारी प्रजाती नसून केवळ शोभिवंत (Ornamental) पक्षी म्हणून पाळली जाते. वर्षातून केवळ २५ अंडी ही कोंबडी देते

जपान सरकारने १९५२ मध्ये या प्रजातीला "राष्ट्रीय नैसर्गिक स्मारक" (Special Natural Monument) म्हणून घोषित केले आहे.

यांची लांब शेपटी खराब होऊ नये, घाण होऊ नये किंवा तुटू नये म्हणून जपानमध्ये त्यांच्यासाठी उंच आणि अरुंद लाकडी पिंजरे बनवले जातात, ज्यांना 'तोम्बाको' (Tombako) म्हणतात. यात कोंबड्याला फिरण्यासाठी फारशी जागा नसते.

जेव्हा या कोंबड्यांना बाहेर चालवले जाते, तेव्हा त्यांची शेपटी जमिनीवर घासून खराब होऊ नये म्हणून ती माणसांना हातात धरून किंवा खास गुंडाळून मागे चालावे लागते.

लांब आणि आकर्षक शेपटी फक्त नर ओनागादोरी (कोंबड्याला) असते. मादी (कोंबडी) दिसायला सर्वसामान्य कोंबडीसारखीच असते आणि तिची शेपटी मोठी नसते.

जपानमध्ये या पक्षाला राजेशाही थाट दिला जातो आणि प्राचीन काळात हे पक्षी केवळ जपानी सम्राट किंवा श्रीमंत सरदारांच्या बागांमध्येच पाहायला मिळत असत.