पुढारी वृत्तसेवा
फ्रिजच्या मागील बाजूची स्वच्छता – फ्रिजच्या मागे आणि खाली धूळ, केस आणि कचरा जमा होतो. त्यामुळे फ्रिजच्या या भागाची आवर्जून स्वच्छता करा.
सोफा आणि बेडखालील जागा – या ठिकाणी धूळ, केस, अन्नाचे कण आणि छोटा कचरा साचलेला असतो. व्हॅक्यूम क्लीनर किंवा झाडूने स्वच्छता करा.
किचनमधील चिमणी स्वच्छ करा – चिमणीचे फिल्टर आणि कॅबिनेटच्या वरच्या भागावर तेलकट चिकट थर जमा होतो. तो व्यवस्थित काढून टाका.
वॉशिंग मशीनचा रबर गॅस्केट स्वच्छ करा – मशीनच्या रबरच्या घड्यांमध्ये साबणाचे अवशेष, ओलावा आणि बुरशी जमा होऊ शकते. डिटर्जंट ट्रेसुद्धा स्वच्छ करा.
पंख्याचे ब्लेड आणि लाइट्स पुसून घ्या – पंख्याच्या पात्यांवर, ट्यूबलाइट आणि सीलिंग लाइटच्या मागे धुळीचा थर साचतो. वीज बंद करून सुरक्षितपणे स्वच्छता करा.
सिंकखालील जागा आणि ड्रेन साफ करा – सिंकखालील पाइप आणि कॅबिनेटमध्ये ओलावा व घाण जमा होते. ड्रेनमध्ये अडकलेले अन्नाचे कण आणि केस काढून टाका.
खिडक्यांच्या जाळ्या आणि दरवाजांच्या चौकटी – खिडक्यांच्या जाळ्यांमध्ये धूळ, माती आणि कोळ्याची जाळी जमा होते. दरवाजांच्या चौकटी आणि कोपरेही व्यवस्थित पुसून घ्या.
बाथरूमचे कोपरे आणि टाइल्समधील सांधे स्वच्छ करा – बाथरूमच्या कोपऱ्यांमध्ये साबणाचे थर, ओलावा आणि बुरशी जमा होऊ शकते. टाइल्समधील सांधे आणि नाल्याचीही स्वच्छता करा.