पुढारी वृत्तसेवा
आहारामध्ये भेंडीचा समावेश करणे केवळ चवीसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
‘फूड सायन्स अँड न्यूट्रिशन’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, भेंडी मधुमेही रुग्णांसाठी एक वरदान ठरू शकते.
भेंडी कापताना जो चिकट पदार्थ बाहेर येतो, तीच या भाजीची सर्वात मोठी शक्ती आहे.
संशोधनानुसार, भेंडीमध्ये मुबलक प्रमाणात ‘विद्राव्य फायबर’ असते. हे फायबर जेवणानंतर रक्तामध्ये साखर मिसळण्याची प्रक्रिया मंदावते.
याचा मोठा फायदा असा होतो की, जेवण झाल्यावर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.
मधुमेहाच्या रुग्णांमध्ये अनेकदा किडनीवर परिणाम होण्याचा धोका असतो.
भेंडीमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंटस् असतात, जे किडनीचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात.
मधुमेही रुग्णांच्या शरीराचे अंतर्गत अवयव सुरक्षित ठेवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे.