Career growth tips: ऑफिस डेस्कवर 'या' गोष्टी कधीही ठेऊ नका; करिअरवर होतो वाईट परिणाम

पुढारी वृत्तसेवा

अनेकदा खूप मेहनत करूनही आपल्याला यश मिळत नाही आणि त्याचे नेमके कारण समजत नाही. तुमच्या ऑफिस डेस्कवरील काही गोष्टी याला कारणीभूत असू शकतात.

वास्तुशास्त्रानुसार, काही गोष्टी डेस्कवर ठेवणे टाळले पाहिजे कारण त्या तुमच्या आयुष्यात नकारात्मकता आणू शकतात.

वास्तुशास्त्रानुसार, ऑफिस डेस्कवर कधीही बंद पडलेले घड्याळ ठेवू नका. यामुळे तुमच्या आयुष्यात विविध समस्या निर्माण होऊ शकतात.

सुकलेली किंवा कोमेजलेली रोपे डेस्कवर कधीही ठेवू नका, कारण ती नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि तुमच्या व्यावसायिक प्रगतीत अडथळा आणू शकतात.

ऑफिस डेस्कवर कधीही तुटलेला कप किंवा ग्लास ठेवू नका. अशा वस्तू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण करतात, ज्यामुळे करिअरची प्रगती खुंटू शकते.

अनेकदा ऑफिस डेस्कवर अनावश्यक वस्तूंचा ढीग साचतो; जुनी बिले किंवा फाटलेले कागद नकारात्मक ऊर्जेचे स्रोत बनू शकतात. रिकाम्या बाटल्या, जुनी बिले, न वापरलेले स्टेशनरीचे साहित्य अशा वस्तू डेस्कवरून त्वरित काढून टाका.

ऑफिस डेस्कवर कधीही तुटलेल्या वस्तू जसे की खराब झालेले पेन, चार्जर किंवा इतर कोणतीही तुटलेली वस्तू ठेवू नका. अशा वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा असते.