Nutmeg Benifits : चिमुटभर जायफळ गाढ व शांत झोपेसाठीच नाही तर इतरही थक्क करणारे फायदे!

पुढारी वृत्तसेवा

आजकालच्या र्स्माटफोन व फास्ट लाईफमध्ये प्रत्‍येकाला एक विकार जडला आहे निद्रानाश Insomnia , यासाठी मग झोपेच्या गोळ्या घेण्याचे प्रमाण वाढले आहे. या गोळ्यांनी साईड इफेक्ट खूप होतो, यामुळे जायफळ या मसाल्याची उपयुक्तता स्पष्ट होते

जायफळ हे प्राचिन काळापासून झोपेसाठी वापरले जाते हे गाढ आणि शांत झोपेसाठी उपयुक्त असते यामध्ये 'मायरिस्टिसिन' (Myristicin) नावाचे घटक असतो, जे मज्जासंस्थेला शांत करते.

मेलाटोनिनची निर्मिती: हे शरीरातील आनंदाचे संप्रेरक (Serotonin) वाढवते, ज्याचे रूपांतर पुढे 'मेलाटोनिन'मध्ये होऊन गाढ झोप येण्यास मदत होते.

रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात चिमूटभर जायफळ पावडर मिसळून प्याल्यास निद्रानाशाची (Insomnia) समस्या दूर होते.

जायफळच्या नियमित सेवनाने गॅस आणि अपचन: पोटातील गॅस, ॲसिडिटी, आणि फुगीरपणा कमी करण्यास मदत करते.तसेच शरीरातील पाचक एन्झाईम्स वाढवून अन्न सहज पचवते.

जायफळाचा सुगंध आणि गुणधर्म मेंदूतील थकवा व Stress कमी करतात. नैराश्य किंवा अस्वस्थता कमी करण्यासाठी हे एक नैसर्गिक औषध म्हणून काम करते.

सांधेदुखी आणि सूज: यातील 'अँटी-इन्फ्लमेटरी' गुणधर्मांमुळे सांधेदुखी, स्नायूंचे दुखणे आणि दाह कमी होतो. जायफळाचे तेल दातदुखी आणि हिरड्यांच्या सुजेवर अत्यंत फायदेशीर ठरते.

पिंपल्स आणि डाग: जायफळात 'अँटी-बॅक्टेरियल' गुणधर्म असतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळे डाग कमी होतात.

जायफळाची पेस्ट दुधात किंवा मधात मिसळून लावल्यास त्वचेचा रंग उजळतो आणि नैसर्गिक चमक येते.

जायफळ हे उष्ण प्रकृतीचे असते, त्यामुळे त्याचा वापर रोज फक्त १ ते २ चिमूट एवढ्याच प्रमाणात करावा. जास्त प्रमाणात सेवन केल्यास चक्कर येणे किंवा मळमळ होणे असा त्रास होऊ शकतो.