Nutmeg and Sleep : निद्रानाशासाठी झोपेच्या गोळ्यांऐवजी चिमूटभर जायफळ घेणे ठरेल अधिक फायदेशीर!

पुढारी वृत्तसेवा

आजकाल निद्रानाशाची समस्या कॉमन झाली आहे, यासाठी सर्रास झोपेच्या गोळ्या घेतल्या जातात पण एक मसाल्यामधील एक पदार्थ या सर्व समस्या चुटकीसरशी सोडवतो तो म्हणजे जायफळ

झोपेच्या गोळ्यांची शरीराला सवय लागते आणि त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. याउलट, जायफळ हा पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित आयुर्वेदिक उपाय आहे.

दिवसभराच्या कामाचा ताण आणि विचारांच्या गर्दीमुळे मेंदू शांत होत नाही. जायफळातील नैसर्गिक शामक (Sedative) गुणधर्म मेंदूला आराम देऊन झोपेसाठी तयार करतात.

ताणतणाव वाढवणारा हार्मोन नियंत्रित ठेवते, शरीरात 'कॉर्टिसोल' (Stress Hormone) वाढल्यास झोप उडते. जायफळातील अँटिऑक्सिडंट्स हा तणाव कमी करून मन प्रसन्न ठेवतात.

जायफळामुळे शरीरात 'सेरोटोनिन' वाढते, ज्याचे रूपांतर पुढे झोपेसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या 'मेलाटोनिन' हार्मोनमध्ये नैसर्गिकरीत्या होते.

Myristicin; जायफळामध्ये 'मायरीस्टिसिन' नावाचे खास संयुग असते, जे मज्जासंस्थेवरील ताण कमी करून गाढ आणि शांत झोप लागायला मदत करते.

जायफळात मॅग्नेशियम भरपूर असते, जे शरीरातील थकलेले स्नायू आणि नसा मोकळ्या करते, ज्यामुळे अंथरुणावर पडल्यावर लवकर झोप लागते.

अनेकदा गॅस, अपचन किंवा वात वाढल्यामुळे रात्री झोप मोडते. जायफळ पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या तक्रारी दूर करून शांत झोप देते.

झोपेच्या गोळ्या घेतल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सुस्ती किंवा जडपणा जाणवतो. मात्र, जायफळाच्या सेवनाने गाढ झोप लागून सकाळी एकदम ताजेतवाने वाटते.

पारंपरिक पद्धतीनुसार चिमूटभर जायफळ कोमट दुधात घालून प्यायल्यास दुधातील 'ट्रिप्टोफॅन' (Tryptophan) आणि जायफळातील घटक एकत्र येऊन झोपेचा प्रभाव अधिक वेगवान करतात.