पुढारी वृत्तसेवा
नाकातून रक्त येण्याची समस्या अचानक उद्भवली की आपण घाबरून जातो.
ही समस्या उष्णतेमुळे किंवा इतर कारणांमुळे होऊ शकते. ते थांबवण्यासाठी घरगुती उपाय आहेत.
1) डोक्यावर थंड पाण्याची धार सोडल्याने नाकतून रक्त येणे लगेच थांबते.
२) दहा ग्रॅम मलतानी माती बारीक करून रात्रभर अर्धा लीटर पाण्यात भिजवून ठेवावी. सकाळी पाणी निथळून कापडात गाळून घ्यावे. हे पाणी प्यायल्याने नाकातून रक्त येण्याचे थांबते.
३) तीन ग्रॅम सुहागा पाण्यात कालवून दोन्ही नाकपुड्यावर लेप करावा. रक्त येणे तत्काळ थांबते.
४) आवळ्याचे पाणी पाजल्याने किंवा आवळा पाण्यात उगाळून कपाळावर, टाळूवर, नाकावर लेप केल्याने नाकातून रक्त येण्याचे बंद होते.
महत्वाची माहिती: हे उपाय 'घरचा वैद्य' या पुस्तकामध्ये सांगितले आहेत. तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.