पुढारी वृत्तसेवा
रात्रीच्या जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याचा ट्रेंड सध्या जास्तच वाढत आहे.
मात्र, आयुर्वेदानुसार, नॉनव्हेज खाल्ल्यानंतर आईस्क्रीम खाणे योग्य आहे की अयोग्य, हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काही गोष्टींवर अवलंबून आहे.
आयुर्वेदानुसार, मांसाहार आणि आईस्क्रीम एकत्र खाणे किंवा एकामागून एक खाणे अयोग्य मानले जाते.
मांसाहार हा स्वरूपाने 'उष्ण' असतो, तर आईस्क्रीम अत्यंत 'शीत' (थंड) असते. या दोन परस्परविरोधी गुणांच्या पदार्थांमुळे शरीरातील पचनशक्ती मंदावू शकते.
यामुळे शरीरात टॉक्सिन्स तयार होऊ शकतात, ज्याचा परिणाम पचनाच्या तक्रारींवर होऊ शकतो.
विज्ञानानुसार, यामागे कोणताही मोठा जीवघेणा धोका नसला तरी काही समस्या उद्भवू शकतात.
काहींना यामुळे पोट फुगणे, गॅस होणे किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो, कारण शरीराला गरम अन्नानंतर अचानक थंड तापमानाशी जुळवून घ्यावे लागते.
जर तुम्हाला गोड खाण्याची खूप इच्छा असेल, तर मांसाहार केल्यानंतर लगेच आईस्क्रीम न खाता किमान १ तासांनी खावे. पण, जास्त प्रमाणात आईस्क्रीम खाणे टाळा.
आईस्क्रीममध्ये असलेल्या शर्करेमुळे शरीराला उत्तेजना मिळू शकते, त्यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.