रात्रीची झोप मुलांसाठी खूपच महत्त्‍वाची...

Shambhuraj Pachindre

मुलांच्‍या आरोग्‍यासाठी रात्रीची शांत झोप ही खूपच महत्त्‍वपूर्ण ठरते.

मुलांनी दररोज किमान ९ ते १० तास झोप घेणे आवश्‍यक असल्‍याचे अनेक संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे..

मुलांनी नियमित वेळेत पुरेशी झोप घेणे आणि यामध्‍ये सातत्‍य ठेवणे हे सर्वांसाठीच खूपच आवश्‍यक आहे.

मुलांनी रात्री जागरण केले तर याचा परिणाम तत्‍काळ त्‍यांच्‍या दुसर्‍या दिवशीच दिसतो. 

कमी झोप झाल्‍यामुळे मुलांचा मूड बदलतो. एकाग्रता साधण्‍यात त्‍यांना त्रास होतो. 

रात्री मुलांचे जागरण हे मुलांच्‍या दुसर्‍या दिवसांच्‍या गुणवत्तेवर परिणाम करणारे ठरते.

नियमित आणि दररोज पुरेशी झोप झाली तरच मुले ही शारीरिक व मानसिक दृष्‍ट्या सक्षम होतात.