Namdev Gharal
ब्राझील, पेरू, कोलंबिया आणि बोलिव्हिया या देशात माकडाची एक प्रजाती आहे जी केवळ रात्रीच दिसू शकते. त्याला नाईट मंकी म्हणातात
नावाप्रमाणेच हे माकड फक्त रात्री सक्रिय असते; दिवसाच्या वेळी झाडांच्या पोकळीत किंवा पानांच्या झुडपात झोपून काढते
सामान्य माकडांना अंधारात दिसत नाही पण या माकडांचेे वैशिष्ट्य म्हणजे हे रात्री एखादा घुबडाप्रमाणे स्पष्टपणे पाहू शकते
याच्या रात्रीच्या फिरण्यासाठी याला मदत करतात त्याचे डोळे, याचे डोळे मोठे आणि चमकदार असतात, ज्यामुळे त्याला अंधारात स्पष्ट दिसते.
या माकडाचे डोळे इतर माकडांपेक्षा खूप मोठे असतात, त्यामुळे ते अधिक प्रकाश (light) पकडतात.
याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठे बुबुळे (pupils): अंधारात हे माकड बुबुळे पूर्ण उघडतात, त्यामुळे शक्य तितका प्रकाश आत जातो.
Night Monkey मध्ये rod cells जास्त असतात, जे अंधारात प्रकाश ओळखण्यासाठी मदत करतात.
हे माकड फळे, पाने, कीटक आणि कधी कधी लहान प्राणी खातं. याचा आकार लहान असतो – शरीर लांबी साधारणतः 25–50 सें.मी.असते.
हे एकनिष्ठ (monogamous) असतात – म्हणजे एकाच जोडीदारासोबत संपूर्ण आयुष्य घालवतात.
पिल्लांची मुख्य काळजी नर माकड घेतं, तर मादी फक्त स्तनपान करते, ही या माकडांमधील खूप वेगळी बाब आहे.