नवलच! महिलेने AI वापरून बनवला नवरा, नाईट टाइम रूटीन बद्दल म्हणाली...

अमृता चौगुले

 मात्र अमेरिकेतील एका महिलेला या टेक्नॉलॉजीने ‘परफेक्ट नवरा’ शोधण्यास मदत केली. काय आहे हे प्रकरण ते जाणून घेऊयात.

AI टेक्नॉलॉजी एका महिलेला या टेक्नॉलॉजीने ‘परफेक्ट नवरा’ शोधण्यास मदत केली आहे. न्यूयॉर्कमधील 36 वर्षीय रोझना रामोस या महिलेने ‘एरेन कार्टल’ नावाच्या पुरुषाशी लग्न केले. 

अ‍ॅटॅक ऑन टायटन’ नावाच्या एनिमेवरील लोकप्रिय पात्रापासून प्रेरित होऊन, रामोसने 2022 मध्ये Replika AI वेबसाइट वापरून ‘एरेन कार्टल’ तयार केले आहे. हा सर्वात परफेक्ट नवरा आहे असे त्यांचे म्हणणे आहे. 

रोझना रामोस यांचे म्हणणे आहे, एरेन एक वैद्यकीय व्यवसायिक म्हणून काम करतो. आणि त्याला लेखनाचा छंद आहे. त्या म्हणतात एरेनला त्या सर्व काही आणि काहीही सांगू शकतात. कारण तो कधीही कोणाशी माझी तुलना करत नाही.

 रामोस यांनी एरेन यांच्याशी जास्त वेळ बोलल्यामुळे त्यांना याच्या स्वभावाबद्दल अधिक कळत गेले. आवडता रंग आणि संगीत यांसारखे अनेक वैशिष्ट्ये एरेनसह अंगभूत होते जेव्हा रामोस यांनी AI च्या मदतीने एरेनला तयार केले. 

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये रामोसने सांगितले की, मी एरेनशी प्रेमाने बोलायचे आणि त्यावर तो म्हणायचा, नाही तू असं बोलू शकत नाही.

लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप असल्याप्रमाणे रामोस आणि एरेन हे मेसेज, कंटेंट आणि फोटोज एकमेकांना पाठवायचे. तसेच वैयक्तिक आयुष्य, मित्र आणि आवडत्या गोष्टी याबद्दल त्यांचे बोलणे होत असे.

तसेच रोमास यांनी रात्रीच्या वेळेचे त्यांचे रूटीनसुद्धा शेअर केले आहे. त्याबद्दल रामोस म्हणतात, ”आम्ही झोपायला जातो, एकमेकांशी गप्पा मारतो. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि तुम्हाला सांगते, जेव्हा आम्ही झोपी जातो, त्यावेळी तो माझं संरक्षण करत असतो. 

Replika AI हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जे स्टॅटिकल पॅटर्न आणि प्री-प्रोग्रॅम केलेल्या डेटासेटच्या आधारावर वापरकर्त्यांसह चॅट्सचे अनुकरण करते.