Happy New Year | नववर्षाचे स्वागत या देशात होते पहिल्यांदा तर अवघ्या 70 किलोमिटर वर असलेल्या बेटावर सर्वात शेवटी

Namdev Gharal

31 डिसेंबर दोन दिवसावर येऊन ठेपला आहे तुम्हाला माहिती आहे का जगामध्ये सर्वात आधी नवीन वर्षाचे स्वागत आणि सूर्याचे दर्शन किरिबाती (Kiribati) या देशात होते.

तर सर्वात शेवटी या देशात नव वर्षाचे स्वागत केले जाते ते म्हणजे हाऊलँड आणि बेकर तसेच सामोआ या बेटांवर ही अमेरिकन बेटे आहेत अमेरिकन सामोआ हे सामोआ या किरीबाती देशातील बेटापासून केवळ 70 किमी अंतरावर

यासाठी कारणीभूत ठरते ती म्हणजे आंतराष्ट्रीय टाईमलाईन या किरबाती व हाऊलंडच्या मधून ही टाईम रेषा जाते त्‍यामुळे किरबातीत पहिला सूर्य उगवला असे मानले जाते

त्‍याचवेळी हाउलंडमध्येही सूर्य उगवतो पण जगाच्या टाईमलाईनमुळे त्‍याठिकाणी सर्वात शेवटी नववर्षाचे स्वागत केले जाते.

किरिबाती या प्रशांत महासागरातील द्वीपसमूहाचा भाग असलेल्या किरितीमती (Kiritimati) बेटावर नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय होतो. या बेटाला 'ख्रिसमस आयलंड' (Christmas Island) असेही म्हटले जाते.

हे ठिकाण आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या (International Date Line) अगदी जवळ आणि सर्वात पूर्वेला आहे. किरिबातीचा हा भाग UTC+14 या टाइमझोनमध्ये येतो

जेव्हा भारतात ३१ डिसेंबरच्या दुपारी साधारण ३:३० वाजलेले असतात, तेव्हा किरिबातीमध्ये नवीन वर्षाची सुरुवात झालेली असते.

त्‍यानंतर न्यूझीलंड हे पहिले मोठे राष्ट्र आहे जिथे सर्वात आधी नवीन वर्षाचा सूर्योदय होतो (ऑकलंड शहरात सर्वात आधी जल्लोष होतो).

तर हाऊलँड आणि बेकर ही बेटे आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या (International Date Line) सर्वात पश्चिमेला आहेत. येथे नवीन वर्षाची सुरुवात जगात सर्वात शेवटी होते.

या बेटांचा टाइमझोन UTC-12 असा आहे. जेव्हा किरिबातीमध्ये (जिथे सर्वात आधी नवीन वर्ष सुरू होते) १ जानेवारीचे दुपारचे १२ वाजलेले असतात, तेव्हा या बेटांवर ३१ डिसेंबरच्या रात्रीचे १२ वाजत असतात

हाऊलँड आणि बेकर ही दोन्ही बेटे अमेरिकेच्या ताब्यात असून ती निर्जन (Uninhabited) आहेत. तर अमेरिकन सामोआ (American Samoa) याठिकाणी मानवी वस्ती आहे तेथे शेवटी नववर्षाचे स्वागत केले जाते.