Independence Day on Ott: हे नव्या दमाचे देशभक्तीपर सिनेमे वीकएंडला पाहू शकता

अमृता चौगुले

आज देश उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या दिवसाला जोडून आलेल्या लॉन्ग वीकएंडला बाहेर जाणार नसाल तर हे सिनेमे जरूर पाहा

सारे जहा से अच्छा : नेटफ्लिक्स

एका गुप्तहेराची गोष्ट तुम्हाला ओटीटीवर पाहता येईल. या सिनेमात प्रतिक गांधी मुख्य भूमिकेत आहे.

तेहरान : झी 5

जॉन अब्राहम या सिनेमात एका हटके भूमिकेत आहे. जिओ पोलिटिकल थ्रीलर असलेला जॉनर तुम्हाला नक्की आवडेल

स्पेशल ओप्स 2: जिओहॉटस्टार

स्पेशल ओप्स या सिरिजचा सिक्वेल पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे

सलाकार : जिओहॉटस्टार

स्पाय थ्रीलर जॉनरमधील हा अजून एक उत्तम सिरिज. मौनी रॉय या सिरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहे

सरजमीन : जिओहॉटस्टार

काजोल यामध्ये दमदार भूमिकेत दिसत आहे. विशेष म्हणजे यात ईबराहीम अलीचा वेब डेब्यू पाहता येईल

अवरोध : सोनी लीव्ह

सर्जिकल स्ट्राइकवर आधारलेला हा अजून एक सिनेमा. हा थरार तुम्ही पुनः अनुभवू शकता

मुखबिर: झी 5

1965 च्या इंडोपाक युद्धादरम्यानच्या एका गुप्तहेराची गोष्ट या सिरिजमध्ये दिसणार आहे.

डिप्लोमॅट : नेटफ्लिक्स

जॉन अब्राहमच्या दमदार अभिनयाने नटलेला आणि सत्य घटनेवर आधारित सिनेमा पाहू शकता