Walking Tips | १०,००० पावलांची गरज नाही; जाणून घ्या चालण्याचा नवा फिटनेस मंत्र

पुढारी वृत्तसेवा

चालणे हा एक उत्तम व्यायाम प्रकार असून तो केवळ मन ताजेतवाने करत नाही, तर आरोग्यावरही अनेक सकारात्मक परिणाम घडवतो

कमी पावले चालले तरी जर ते नियमित केले तर हृदयविकार आणि अकाली मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो

ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनच्या अहवालात पावलांची संख्या, आयुष्याची लांबी आणि हृदयाचे आरोग्य यांचा संबंध तपासण्यात आला

दररोज १०,००० पावले चालण्याचा नियम फिटनेससाठी एक सर्वसाधारण मापदंड मानला जातो, मात्र, तज्ज्ञांच्या मते आता हा निकष बदलण्याची वेळ आली आहे

आठवड्यातून एक-दोन दिवस दररोज ४,००० पावले चालले, तरी मृत्यूचा धोका सुमारे २६ टक्क्यांनी आणि हृदयविकाराचा धोका २७ टक्क्यांनी कमी होतो

दररोज ७,००० पावले चालल्यास आयुष्य वाढीसाठी थोडा अधिक फायदा होतो. मात्र, हृदयाच्या आरोग्यावर त्याचा फारसा अतिरिक्त परिणाम दिसून येत नाही

त्यामुळे तुम्ही रोज ४,००० पावले चालत असाल, तरी तेही पुरेसे फायदेशीर आहे. कमी प्रमाणात पण सातत्य ठेवले तर त्यातून चांगली प्रगती साधता येते

संशोधकांच्या मते, तुम्ही आठवड्यात किती दिवस चालता यापेक्षा दररोज एकूण किती पावले चालता हे अधिक महत्त्वाचे आहे

चालणे हा हलका आणि शरीरावर कमी ताण देणारा कार्डिओ व्यायाम आहे. त्यामुळे तो हळूहळू फिटनेस वाढवण्यास मदत करतो

येथे क्लिक करा