Cholesterol Guidelines: तिशीतच कॉलेस्ट्रॉल 'कंट्रोल' करावं लागणार... तज्ज्ञांचा इशारा

Anirudha Sankpal

ह्रदयविकारांचा धोका कमी करण्यासाठी अमेरिकन हार्ट असोसिएशनसह ११ संस्थांनी कोलेस्ट्रॉलबाबतच्या नवीन मार्गदर्शक सूचना (Guidelines) जारी केल्या आहेत

कमी वयात तपासणी

वाढत्या धोक्यामुळे आता वयाच्या १० व्या वर्षापासूनच मुलांचे 'बॅड कोलेस्ट्रॉल' (LDL) तपासण्याची शिफारस करण्यात आली आहे.

नियमित फॉलोअप

पहिली तपासणी १० व्या वर्षी, दुसरी १८ ते २० व्या वर्षी आणि त्यानंतर दर ५ वर्षांनी कोलेस्ट्रॉलची चाचणी करणे अनिवार्य आहे.

कडक नियम (LDL मर्यादा)

सामान्य व्यक्तीसाठी LDL १०० पेक्षा कमी असणे आवश्यक आहे, मात्र हृदयविकाराचा धोका असल्यास ते ७० च्या खाली हवे.

रुग्णांसाठी कडक नियम

ज्यांना आधीच हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊन गेला आहे, त्यांनी आपले 'बॅड कोलेस्ट्रॉल' ५५ पेक्षाही कमी राखणे गरजेचे आहे.

धोका ५० टक्क्यांनी कमी

या नवीन नियमांचे काटेकोर पालन केल्यास भविष्यातील हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.

सप्लीमेंट्सवर विश्वास नको

माशांचे तेल, हळद किंवा लसणाच्या गोळ्या कोलेस्ट्रॉल कमी करण्यात क्लिनिकल ट्रायलमध्ये अपयशी ठरल्या आहेत, त्यामुळे त्यावर अवलंबून राहू नका.

ब्लॉकेजचा धोका

शरीर जितके जास्त दिवस हाय कोलेस्ट्रॉलच्या संपर्कात राहील, तितका धमन्यांमध्ये ब्लॉकेजचा धोका वाढतो, म्हणून वयाच्या ३० पासूनच सावध राहा.

जीवनशैलीत बदल

कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम हा सर्वात प्रभावी मार्ग असून गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.

येथे क्लिक करा