पुढारी वृत्तसेवा
घड्याळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वेळेची सांगड घालण्यासाठी घड्याळ महत्त्वाची भुमीका बजावते.
चुकीच्या दिशेला लावलेले घड्याळ घरात वास्तूदोष निर्माण करू शकते.
वास्तूनुसार भिंतीवर घड्याळ पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवणे शुभ मानले जाते.
पूर्वेकडील भिंतीवर घड्याळ लावल्याने देवी लक्ष्मी घरात येते. याशिवाय घरात राहणाऱ्या लोकांच्या मनात सकारात्मक विचार येतात.
घराच्या दक्षिण दिशेला घड्याळ ठेवल्यास नकारात्मक ऊर्जेचा सर्वाधिक प्रभाव पडतो. त्यामुळे दक्षिणेकडील भिंतीवर कधीही घड्याळ लावू नये.
घराच्या कोणत्याही दरवाजावर घड्याळ लावू नये. त्या घड्याळाखाली जाणारी कोणतीही व्यक्ती नकारात्मक ऊर्जेने प्रभावित होउ शकते.
वास्तुशास्त्रानुसार तुटलेले किंवा बंद घड्याळ कधीही घरात ठेवू नये. घड्याळ बंद ठेवल्याने गरिबी वाढते. त्याच वेळी, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्रगती खुंटते अशी धारणा आहे.
वास्तूनुसार घरामध्ये हलक्या हिरव्या, तपकिरी आणि पिवळ्या रंगाचे घड्याळ लावणे शुभ मानले जाते.